‘फादर्स डे’ आधी सोनूने मुलगा इशांतला भेट केली महागडी कार


गेल्या वर्षापासून अभिनेता सोनू सूद कोणत्या ना कोणच्या कारणामुळे कायम चर्चेत आहे. दरम्यान, ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आपल्या मुलाला सोनू सूदने एक गाडी भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे. काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० सोनूने इशांतला भेट म्हणून दिली आहे. ३ कोटी रुपयांच्या जवळपास या गाडीची किंमत असल्याचे म्हटले जात आहे.

माहितीनुसार, गेल्या आठवड्यातच भारतात मर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. युट्यूबवर याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओ सोनूकडे या गाडीची डिलिव्हरी झाल्याचे दिसते आहे. त्यानंतर सोनू त्याच्या कुटुंबाला ड्राईव्हवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

अनेक महागड्या गाड्या सोनूकडे आहेत. सोनूला गाड्यांची आवड आहे. सोनूकडे आधीपासून ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ एमएल क्लास आणि पोर्शे पानामेरा आहे. दरम्यान, सोनू लवकरच ‘पृथ्वीराज’, ‘अल्लुडू अधुर्स’, ‘आचार्य’ आणि ‘थमिलरसन’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.