१२५ कोटी मानधना सह डिजीटल डेब्यू साठी तयार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण डिजीटल डेब्यूसाठी तयार असून ‘रुद्र’ सिरीज प्रोजेक्टचे शुटींग लवकरच सुरु करत असल्याची बातमी आहे. ब्रिटीश शो ‘लुथर’ चा हा रिमेक आहे. अजय यात वेगळ्याच भूमिकेत दिसणार असून त्याने डिजिटल डेब्यू साठी १२५ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. ही बातमी खरी असेल तर अजय ओटीटी डेब्यूसाठी सर्वात महाग अभिनेता ठरणार आहे.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्ट नुसार अजय देवगण आणि स्टार नेटवर्क यांच्यात चांगली दोस्ती आहे. यामुळेच ‘भुज’ चित्रपटाचा प्रीमियर हॉट स्टार वर झाला. या नेटवर्कबरोबर अजयने सॅटेलाईट राईटस साठी करार केला आहे. डिजीटल डेब्यू साठी अजयला जे १२५ कोटी मानधन मिळणार आहे, त्यात स्टार नेटवर्क प्रोमो शूट, सोशल मिडिया पोस्ट, रीअॅलिटी शोजमध्ये उपस्थिती आणि अन्य प्रमोशन कार्यक्रमांचा समावेश आहे. अजय रुद्रच्या प्रती एपिसोड साठी २ कोटी रुपये घेणार आहे.

यापूर्वी अक्षयकुमार याने २०१९ मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडीओ प्रोजेक्ट ‘ द एंड’ साठी डिजीटल डेब्यू करताना ९० कोटी रुपये मानधन घेतले होते असे सांगितले जाते.