मॅकडोनाल्डस विषयीची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

mcdonald
फास्ट फूडची आवड आजकालच्या काळामध्ये केवळ लहान मुलांच्या पुरतीच मर्यादित राहिलेली नसून, मुलांच्या जोडीने त्यांचे आई-बाबा आणि अगदी आजी आजोबा देखील आवडीने बर्गर, फ्रेंच फ्राईजचा आनंद चवीने घेत असतात. बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि तत्सम फास्ट फूडची ट्रेंड भारतामध्ये आली, ती मुख्यत्वे मॅकडोनाल्डस सारख्या फास्ट फूड रेस्टॉरंट चेनमुळे. आता ही रेस्टॉरंट जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या शहरामध्ये अस्तित्वात आहेत. मॅकडोनाल्डसची सर्वप्रथम सुरुवात १९५५ साली कॅलिफोर्निया येथील सॅन बर्नार्डीनो येथे झाली होती. सुरुवातीला केवळ एकच फास्ट फूड रेस्टॉरंट असलेल्या या रेस्टॉरंटच्या चेन्स कालांतराने जगभर दृष्टीस पडू लागल्या. अश्या या सुप्रसिद्ध फास्ट फूड चेन विषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
mcdonald1
जगभरातील नामांकित फास्ट फूड चेन्सचा डेटा गोळा करणाऱ्या वेबसाईटनुसार, जगभरातील मॅकडोनाल्डसमध्ये एका सेकंदाला तब्बल पंच्याहत्तर हॅमबर्गर्सची विक्री होत असते. केवळ अमेरिकेतच या सुप्रसिद्ध फास्ट फूड रेस्टॉरंटस् ची संख्या १४, १४६ असून, या सर्व रेस्टॉरंटस् मध्ये एक बिलियन पाउंड्स इतक्या वजनाच्या बीफचा वापर हॅमबर्गर्स बनविण्यासाठी केला जात असतो. अमेरिकेतील सर्व मॅकडोनाल्डस मध्ये एकूण सत्तर मिलियन ग्राहक दररोज येत असल्याचे या वेबसाईट डेटा मध्ये म्हटलेले आहे.
mcdonald2
संपूर्ण जगामध्ये मॅकडोनाल्डसची एकूण ३८, ८९९ रेस्टॉरंटस् आहेत. ‘बर्गर किंग’, ‘टॅको बेल’ यांसारख्या फास्ट फूड रेस्टॉरंटस् च्या एकत्रित संख्येच्या मानानेही पुष्कळ जास्त आहे. तसेच अमेरिकेमध्ये दर आठ व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मॅकडोनाल्डस मध्ये काम करीत आहे. यावरून या रेस्टॉरंटचा व्याप किती मोठा आहे, हे आपल्या लक्षात येईल. मॅकडोनाल्डस ही फास्ट फूड रेस्टॉरंट चेन अतिशय श्रीमंत असून, एखाद्या विकसनशील देशापेक्षाही अधिक आर्थिक उत्पन्न यांच्याकडे आहे.
mcdonald3
या रेस्टॉरंटमध्ये सर्वात लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज. हे केवळ तळलेले बटाट्याचे साधे काप अ असले, तरी वास्तविक हा पदार्थ तितका साधा नाही. हा पदार्थ बनविण्यासाठी तब्बल वीस पदार्थांचा वापर करण्यात येतो. या फ्राईज बनविण्यासाठी निरनिराळी तेले, मीठ, आणि रसायनांचा वापर केला जातो. मॅकडोनाल्डस अमेरिकेमध्ये इतके लोकप्रिय आहे, की १९६८ साली फ्रान्समध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या खेळाडूंना जेव्हा घरची आठवण होऊ लागली, तेव्हा त्यांच्यासाठी खास विमानाने मॅकडोनाल्डसचे हॅमबर्गर्स पाठविण्यात आले होते.

Leave a Comment