कन्नड भारतातील सर्वात Ugliest Language; गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमक


बंगळुरु: भारतातील सर्वात वाईट भाषा(Ugliest Language in India) असे सर्च इंजिन गुगलवर सर्च केल्यास जे उत्तर येत आहे. त्यामुळे कन्नड भाषिक आक्रमक झाले आहेत. गुगलवर सर्च केल्यास ते उत्तर कन्नड भाषा असे येत आहे. 6 कोटी नागरिकांची कन्नड ही बोली भाषा आहे. हा वाद ज्या वेबसाईटमुळे सुरु झाला, ती वेबसाईट आता बंद आहे. पण, गुगलला कन्नड भाषिकांनी माफी मागण्यास सांगितले आहे. गुगलकडे तक्रार करुन ही चूक दुरुस्त करण्यास कन्नड भाषिकांनी सांगितले आहे. तसा उल्लेख debtconsolidationsquad.com या वेबसाईटवर करण्यात आला होता. संबंधित वेबसाईट आता बंद आहे.

आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहे. गुगलला कन्नड भाषेची बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कन्नड भाषेचे, कन्नड नागरिकांची जमीन, पाणी, भाषा आणि संस्कृती यावरुन हेटाळणी स्वीकारली जाणार नाही. हा कन्नड भाषेविरुद्ध नियोजित कट आहे. कन्नड भाषेच्या बदनामीविषयी छोटी गोष्ट देखील खपवून घेतली जाणार नाही, असे कन्नड विकास प्राधिकरणाचे टीएस नागभरण यांनी सांगितले आहे.


गुगलवर जेव्हा भारतातील वाईट भाषा इंग्रजीमध्ये Ugliest Language in India असे सर्च केले गेलं तेव्हा कन्नड भाषा असे दाखवत होते. ही माहिती त्या लिंकवर केल्यास debtconsolidationsquad.com या वेबसाईटवर असल्याचे समोर आले होते. पण, आता ती वेबसाईट बंद आहे. त्या वेबसाईटमुळे गुगलवर कन्नड ही वाईट भाषा असे उत्तर येत होते. आता वेबसाईट बंद असल्यामुळे त्याबाबत माहिती मिळत नाही. मात्र, गुगलने याबाबत दक्षता घेतली पाहिजे, असे कन्नड भाषा प्रेमींनी सांगितले.

कन्नड भाषेबद्दलचा प्रकार समोर आल्यानंतर कन्नड भाषाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. गुगलने याबाबत सोशल मीडियावरुन माफी मागितली पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. थिंकनेक्सट आणि बंगळुरुमधील आयटी कंपनीनं चेंज ऑर्गवर पिटीशन साईन केली आहे. तो सर्च रिझल्ट गुगलने हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कन्नड भाषाविरोधकाने ही माहिती भरली असेल, त्यामुळे तसे दिसत असावे, असे स्पष्टीकरण गुगल इंडियाकडून देण्यात आले आहे.