उद्यापासून शिथील होणार नाशिकमधील लॉकडाऊनचे निर्बंध; ही आस्थापने होणार सुरु ?


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. नाशिकमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असल्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नाशिकमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. व्यापारी, दुकाने यांना सवलत देण्यात आली असून उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायिकांची दुकाने सुरू होणार आहेत.

निर्बंधांमध्ये काय सवलत देण्यात आली आहे?

  • आस्थापना दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.
  • भाजीपाला विक्री 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.
  • शिवभोजन 10 ते 2 पार्सल सेवा सुरू राहणार.
  • अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.
  • दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नाही.
  • शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील.
  • सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत बँक सुरू राहणार.
  • निर्बंध 15 जूनपर्यंत लागू राहणार.
  • उद्यापासून सुरू होणार सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकाने.