वैज्ञानिकांनी उघडे पाडले चीनचे पितळ; जगासमोर आले कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य


नवी दिल्ली : वुहान इंन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजीच्या बायो सेफ्टी लेवल 4 मध्येच कोरोना व्हायरसला चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केले असून एका अभ्यासातून याविषयीचे पूरावे समोर आले आहे.

अभ्यासात म्हटले गेले की, व्हायरसला तयार करण्यासाठी चिनी वैज्ञानिकांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग व्हर्जनने बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून असे वाटावे की, कोरोना वटवाघळामुळे पसरला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार हा अभ्यास अहवाल ब्रिटिश प्रोफेसर एंगस डल्गलिश आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी तयार केला आहे.

या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, कोरोनावर चीनमध्ये रेट्रो इंजिनिअरिंग केली जात असल्याचे 1 वर्षाहून अधिक पूरावे आमच्याकडे आहेत. परंतू या अभ्यासाकडे शैक्षणिक साहित्य आणि प्रमुख मासिकांनी दूर्लक्ष केले आहे. प्रोफेसर डल्गलिश लंडनमध्ये सेंट जॉर्ज यूनिवर्सिटीमध्ये कॅंसरचे प्रोफेसर आहेत. ते सोरेनसेन कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोना लस तयार करीत आहे.

अभ्यासात म्हटले गेले आहे की, वुहान लॅबमध्ये कोरोना संदर्भातील डाटा मुद्दाम नष्ट करण्यात आला. त्याविरोधात ज्या वैज्ञानिकांनी आवाज उचलला त्यांचा आवाज दाबण्यात आला किंवा त्यांना गायब करण्यात आले. जेव्हा दोघे वॅक्सिन बनवण्यासाठी आम्ही कोरोना सॅंपल्सचा अभ्यास करत होतो. तेव्हा कोरोनामध्ये एक विशेष ‘फिंगरप्रिंट’ चा शोध लागला. वैज्ञानिकांचे याबाबत असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरससोबत लॅबमध्ये छेडछाड केल्याशिवाय असे होणे शक्य नाही.