कसोटी चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर आयसीसीची तीन मोठ्या निर्णयांना दिली मंजुरी


मुंबई: 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. पण आसीसीने या सामन्याआधी तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर या तीन निर्णयांमुळे मोठा फरक यापुढे पाहायला मिळणार आहे. तर याचा फायदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंड सीरिजमध्ये देखील होणार आहे.

आयसीसीच्य़ा नव्या नियमानुसार आता मॅच रेफरीला राखील दिवसासंदर्भात निर्णय शेवटच्या दिवशी सामना एक तास संपण्याआधी जाहीर करावा लागणार आहे. याशिवाय आणखी तीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. डीआरएस घेण्यापूर्वी बॅट्समॅन किंवा फील्डिंग कॅप्टन अंपायरला विचारू शकतील. त्यामुळे आता आढावा घेणे सोपे होईल. दुसरा निर्णय म्हणजे बेल्सची उंची वाढवण्यात आली आहे. अर्ध्या इंचाने उंची वाढवली आहे. यापुढे 28 इंच स्टंप आणि अर्धा इंच बेल्स असणार आहे. जर बेल्सच्या 50 टक्क्याहून जास्त वर बॉलचा भाग असेल तर नॉटआऊट देण्यात येईल. त्यामुळे आता प्रत्येकवेळी अंपायर कॉल घ्यावा लागणार नाही. शॉर्ट रनच्या संदर्भातील तिसरा बदल आयसीसीने केला आहे. आता शॉर्ट रनचा निर्णय थर्ड अंपायर घेईल. थर्ड अंपायर रिप्ले पाहिल्यानंतरच निर्णय घेणार आहे.