देशातील सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत Paytm


नवी दिल्ली : आता देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेली पेटीएम करता आहे. त्या आधारे पेटीएमकडून प्रायमरी मार्केटमधून 21,800 कोटी रुपये उभारण्याची तयारी करण्यात येत असल्यामुळे त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात ब्लुमबर्गच्या माहितीनुसार, पेटीएमची पेरेंट कंपनी असलेल्या One97 कम्युनिकेशनची आज बोर्ड मीटिंग असून आयपीओचा हा निर्णय त्या मीटिंगमध्ये होण्याची शक्यता आहे. जवळपास 21,800 कोटी रुपयांचा हा आयपीओ असेल. पेटीएमचा हा आयपीओ या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. पेटीएम कंपनीची मार्केट व्हॅल्यू सध्या 16 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

2020 साली पेटीएम कंपनीची 3280 कोटी रुपये कमाई होती. त्यामध्ये या वर्षी घट होऊन ती 2942 कोटी रुपयांवर आली आहे. पेटीएमची भारतीय मार्केटमध्ये स्पर्धा ही PhonePe, Google Pay, Amazon Pay आणि Whatsapp Pay शी आहे. भारतात पेटीएमकडे दोन कोटींहून जास्त मर्चंट्स पार्टनर्स आहेत आणि ग्राहकांकडून महिन्याला 1.4 अब्ज रुपयांचे ट्रान्जेक्शन केले जाते.