जेफ बेझोसना यांना पछाडत फॅशन इंडस्ट्रीमधील Bernard Arnault बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि एलोन मस्क हे गेल्या अनेक आठवड्यांपासून आलटून पालटून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी होते. पण या दोघांनाही आता मात मिळाली आहे. जगातील पहिल्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्तीची खुर्ची जेफ बेझोस यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. आता जगातील सर्वात मोठी फॅशन लक्झरी वस्तू कंपनी लुई विटॉन मोट हेनेसीचे 72 वर्षीय मालक बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नाल्टची एकूण मालमत्ता 186.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 13.28 लाख कोटी एवढी आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या कुटुंबाद्वारे नियंत्रित फ्रेंच लेव्हल ब्रँड कंपनीचे शेअर्स 538 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले. बर्नार्ड अर्नाल्टची संपत्ती यावर्षी आतापर्यंत 72 अब्ज डॉलर्सने वाढल्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ते बनले आहेत.

यावर्षी 2 टक्क्यांने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची संपत्ती कमी झाली आहे. त्याचबरोबर जगातील तिसरे श्रीमंत उद्योगपती आणि ई-वाहन उत्पादक टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क यांची मालमत्ता यावर्षी 8.09 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 60,000 कोटी रुपयांनी घटली आहे.

तर दुसरीकडे यावर्षी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी मालमत्तेत 7.50 टक्के वाढ नोंदविली आहे. त्याच वेळी फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती जवळपास 14 टक्क्यांनी वाढली आहे. जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफेच्या मालमत्तेत जवळपास 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या व्यतिरिक्त गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेजची संपत्ती यावर्षी 22.80 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

जगभरातील 70 ब्रँडचे अर्नाल्ट मालक आहेत, ज्यात लुई व्हूटन आणि सेफोरा सारख्या जगातील नामांकित ब्रँडचा समावेश आहे. त्यांचा Christian Dior मध्ये 96.5% हिस्सा आहे, ज्याचा एलव्हीएमएचमध्ये 41 टक्के हिस्सा आहे. अर्नाल्टचा यांचा जन्म फ्रान्समधील तिसरे सर्वात मोठे शहर Roubaix येथे 5 मार्च 1949 रोजी झाला. त्यांनी नामांकित कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अर्नाल्ट यांच्या वडिलांचा कंस्ट्रक्शन बिजनेस होता. अर्नाल्ट यांनी 1985 मध्ये 15 दशलक्ष डॉलर्समध्ये Christian Dior खरेदी करून नवीन व्यवसायात पाऊल ठेवले. 1989 मध्ये, ते एलव्हीएमएच येथे मेजॉरिटी स्टॅक होल्डर झाले आणि जगातील सर्वात मोठा लक्झरी प्रॉडक्ट ग्रुप उभा केला.