eBay वर दुसऱ्या महायुद्धातील जिवंत बॉम्ब विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक


लंडन – ऑनलाईन बाजारात कोणती गोष्ट केव्हा विकली जाईल याचा काही नेम नाही, त्यातच यापूर्वी देखील अशा पद्धतीने ऑनलाईन वस्तु विकल्या गेल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केले गेले आहे. पण यावेळी तर चक्क बॉम्ब eBay या संकेतस्थळावर विकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यूकेमधील एका धातू शोधकाला हॅम्पशायर, स्वेथलिंगमध्ये त्याच्या भावाच्या घराजवळ द्वितीय विश्वयुद्धातील बॉम्ब सापडला होता. eBay वर त्याची त्याने जाहिरात केली. दरम्यान, त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि त्याला अटक केली. तसेच बॉम्ब घेऊन जाण्यासाठी तेथील कुटुंबियांना हलविण्यात आले होते.

५१ वर्षीय मार्क विल्यम्स यांनी तज्ञांनी इशारा देऊनही ई-कॉमर्स वेबसाइटवर प्राणघातक शस्त्रे लिस्ट केली होती. मिलिटेरियाचे कलेक्टर रल्फ शेर्विन यांनी सोमवारी eBay वर बॉम्ब पाहिल्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. डब्ल्यूडब्ल्यूआयआय जर्मन इन्सेन्डियरी बॉम्ब – अस्सल, अस्सल साऊथॅम्प्टन ब्लिट्ज. अट – वापरलेला, अशा मथळ्यासह eBay वर या बॉम्बचा फोटोसोबत लिहिला होता.

त्यानंतर विल्यम्स यांना तो बॉम्ब जिवंत असल्याचा रल्फ शेर्विन यांनी मेसेज केला. विल्यम्स यांनी आपण धातूशोधक असल्याचे सांगितले. तसेच साउथॅम्प्टनमधील मुलांच्या खेळाच्या मैदानावर खोदकामात मिळाल्याचे सांगितले, अशी माहिती शेर्विनने डेली मेलला दिली आहे. तो बॉम्ब जिवंत असल्याचे शेर्विनने विल्यम्सला समजावून सांगितले. पण त्याने दुर्लक्ष केले.

त्याला बॉम्ब खाली ठेवून पोलिसांना कळविण्याचे शेर्विनने सांगितेले. पण शर्विन यांच्या बोलण्याकडे विल्यम्सने दुर्लक्ष केले आली आणि बॉम्बची विक्री सुरु ठेवली. त्यानंतर त्याने शेर्विनच्या मेसेजला उत्तर देणे बंद केले, त्यावेळी पोलिसांना संपर्क करण्यात आला.

शेर्विन म्हणाले, मी हॅम्पशायर पोलिसांना याबाबत कळविले. त्यानंतर मला समजले की त्यांनी ईबेशी संपर्क साधला, त्याचा पत्ता शोधला आणि त्याला ताब्यात घेतले. मी काही केले नसते तर मी स्वतःला कधीच माफ केले नसते.

विल्यम्सच्या ठिकाणी मंगळवारी पोलीस पोहचले आणि त्यांनी त्या जागेवर ५० मीटरची दोरी लावली आणि स्वेथलिंगमधील हेव्हनस्टोन वेच्या आसपासच्या कुटुंबांना घरातून बाहेर काढले. यावेळी प्राणघातक बॉम्ब नेण्यासाठी फायरमन आणि लष्कराची स्फोटक आयुध डिस्पोजल टीम सामील झाली होती.