कंगनाच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा दाखल

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा बॉडीगार्ड कुमार हेगडे यांच्यावर मुंबई पोलिसांनी बलात्काराचचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात एका ३० वर्षीय ब्युटीशियन महिलेने हेगडे याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे.

या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गेल्या जून मध्ये एका फिल्म शुटींग दरम्यान हेगडेची भेट झाली. प्रत्यक्षात ही महिला आठ वर्षापूर्वी कुमार हेगडे यांच्या संपर्कात आली होती. पण जून मध्ये भेट झाल्यावर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि नंतर आई आजारी आहे, तिला भेटायला जातो असे सांगून आणि या महिलेकडून ५० हजार रुपये घेऊन हेगडे गेला. तेव्हापासून हेगडे या महिलेला भेटलेला नाही.

या संदर्भात कंगनाच्या टीम बरोबर संपर्क केला तेव्हा हेगडे गेले कित्येक दिवस सुट्टीवर गेला असून त्याच्याशी कोणताच संपर्क राहिलेला नसल्याचे सांगण्यात आले असे समजते.