राफेल जेट फायटर आणि बुगाटी कारच्या थरारक रेस मध्ये विजय कुणाचा?

वेगासाठी प्रसिद्ध बुगाटी चिरोन पर स्पोर्ट्स व राफेल जेट फायटर यांच्यातील एका रोमांचक, थरारक रेस डसोल्टच्या हेडक्वार्टर मध्ये पार पडली. बुगाटीचा सर्वाधिक वेग आहे ताशी ४९० किमी आणि राफेलचा वेग आहे ताशी १९१२ किमी. म्हणजे वास्तविक विमान आणि कार यांची रेस होऊ शकत नाही असे कुणालाही वाटेल. पण नाही. ही रेस झाली आणि जमिनीवर ती चक्क बुगाटीने जिंकली.

या रेसचे वर्णन करताना बुगाटी चिरोन पर स्पोर्टचा चालक म्हणाला, १०० मीटर अंतर कापेपर्यंत मी राफेलचा मागे होतो पण नंतर काही मीटर मी राफेलला मागे टाकून पुढे होतो. ते नंतर कुठे गायब झाले ते समजले नाही. मला वाटले, मला मागे टाकून ते पुढे गेले पण प्रत्यक्षात राफेलने आकाशात झेप घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार राफेलचा पहिल्या १५० मीटरचा प्रवास १६५ किमी वेगाने झाला तेव्हाच ते बुगाटीचा मागे पडले होते. ३५० मीटर अंतर कापताना राफेलचा वेग २१० किमीवर होता आणि ४५० मीटरवर २६० किमी. येथून खरी चुरस सुरु झाली. कारण बुगाटी चिरोनने २.४ सेकंदात १०० किमीचा वेग गाठला होता आणि ६.१ सेकंदात २०० किमी, १३ सेकंदात ३०० किमी आणि त्यानंतर ४०० किमी वेगाने ही कार धावली. बुगाटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

बुगाटी चिरोन पस स्पोर्टची किंमत ३.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २६ कोटी रुपये आहे.