अदर पूनावाला यांनी Panacea Biotec मधील आपला हिस्सा 118 कोटींना विकला


मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी पॅनेसिया बॉयोटेकमधील आपला 5.15 टक्के हिस्सेदारी ओपन मार्केट डिल अंतर्गत 118 कोटी रुपयांना विकली आहे. सीरमने हे शेअर्स खरेदी केले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) संपूर्ण कराराच्या आकडेवारीनुसार, पूनावाल यांनी पॅनेसियाच्या 31,57,034 शेअर्सला प्रति शेअर 373.85 रुपये दराने विक्री केली, ज्यात त्यांना एकूण 118.02 कोटी रुपये मिळाले. सीरमने हे शेअर्स स्वतंत्र किंमतीत समान समभागात खरेदी केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, हे शेअर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) खरेदी केले आहेत.

औषध उद्योगातील पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec) एक सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्ट निर्माता आहे, जो मनुष्य आणि प्राणी दोन्हीसाठी लस तयार करतो. 1984मध्ये ही कंपनी स्थापन केली गेली आणि पॅनासिया बायोटेक लिमिटेडच्या नावाखाली 1995 मध्ये लिस्टेड केली गेली.

बीएसई ब्लॉक डीलच्या आकडेवारीनुसार, अदर पूनावाला यांनी प्रति शेअर 373.85 रुपये किंमतीला Panacea Biotecचे 31,57,034 शेअर्स विकले. यातून पूनावाला यांना एकूण 118.02 कोटी रुपये मिळाले. 2021 च्या मार्च रोजी पॅनासिया बायोटेकच्या शेअरहोल्डिंग आकडेवारीनुसार, अदर पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे कंपनीत सार्वजनिक भागधारक होते आणि अनुक्रमे 5.15 टक्के आणि 4.98 टक्के होते. सोमवारी पॅनासिया बायोटेकचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 384.9 रुपयांवर बंद झाले.