अखेर वृद्धिमान साहाची कोरोनावर यशस्वी मात


मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्याआधी एक दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झालेल्या वृद्धिमान साहाने अखेर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

सलग दोन कोरोना टेस्ट विकेटकीपर आणि फलंदाज असलेल्या साहाचे निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय संघात दाखल होईल. दोन जून रोजी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू मुंबईत काहीदिवस बायो बबलमध्ये राहणार आहेत.

आयपीएलच्या १४व्या हंगामात वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. तो चार मे रोजी पॉझिटिव्ह झाला होता. बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याआधीच तो आयसोलेट झाला होता. इंग्लंड दौऱ्यात ऋषभ पंत भारताचा विकेटकीपर असला तरी हा दौरा मोठा आहे. त्यामुळे साहाचा देखील संघात समावेश केला होता. पण तो दौऱ्यावर जाणार का ही गोष्टी त्याच्या फिटनेसवर ठरणार होती. आता साहाने कोरोनावर मात केल्या,ने तो भारतीय संघासोबत इंग्लंडला जाऊ शकतो. साहा सध्या दिल्लीत आहे. तेथून तो घरी जाणार आणि काही दिवस कुटुंबासोबत राहिल्यानंतर मुंबईत येणार असल्याचे कळते.