हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन


नवी दिल्ली – ५जी स्मार्टफोनची किंमत अगदी सुरुवातीला खूप जास्त होती. पण ती आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आली आहे. अनेक उत्कृष्ट ५ जी स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध झाले आहेत. जर तुम्हाला कमी किंमतीत एक चांगला ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर त्याबद्दलची माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग बघुया कोणते आहेत ते स्मार्टफोन…

रिअलमी ८ (किंमत – १३,९९९ रुपये)
रिअलमी८ ५ जी स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात १३,९९९ रुपये आहे. रिअलमी८ ५जी मध्ये ६.५ इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून डायमेंसिटी ७०० ५जीचा वापर केला गेला आहे. क्वाड कॅमेरा सेटअप रिअलमी८ ५जी स्मार्टफोनच्या मागील पॅनेलवर देण्यात आले आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा B&W कॅमेरा आणि मॅक्रो लेन्ससह ४८ एमपी प्रायमरी कॅमेराचा सपोर्ट आहे, फोन ५ नाईट स्केप फिल्टरसह येईल. समोर एक १६ एमपी कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोनला अधिक पावर देण्यासाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी १८ डब्ल्यू फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येते. हे अँड्रॉइड ११ आधारित रिअलमी यूआय २.० वर काम करेल.

ओपो ए ५ एस (किंमत – १४,९९० रुपये)
६.५२ इंचचा एचडी प्लस डिस्प्ले ओप्पो ए ५ एस ५ जी स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यात पहिला १३ एमपी मुख्य कॅमेरा, दुसरा २ एमपी डीप सेन्सर आणि तिसरा २ एमपी मॅक्रो लेन्स आहे. तर त्याच्या पुढील पॅनेलमध्ये ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पो ए ५ एस स्मार्टफोनमध्ये ५,००० एमएएच बॅटरी आहे. हा स्मार्टफोन कलर ओएस ११.१ आधारित अँड्रॉइड ११ वर काम करतो. ओप्पो ए ५ एस स्मार्टफोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९० रुपये आहे.

रिअलमी नरझो ३० प्रो (किंमत – १६,९९९ रुपये)
अँड्रॉइड १० ओएस वर आधारित रिअलमी नरझो ३० प्रो ५जी आहे आणि हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ८०० यू प्रोसेसरवर काम करतो. ६.५ इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले यात देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३० डार्ट चार्ज सपोर्टसह येते. रिअलमी नरझो ३० प्रो ५ जी मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राथमिक सेन्सर ४८ एमपी आहे, तर त्यात ८ एमपीचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ एमपी मॅक्रो शूटर आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये पंच होल कटआउटसह १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे.

शाओमी मी १० आय (किंमत – २०,९९९ रुपये)
शाओमी मी १० आय स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजची किंमत २०,९९९ रुपये आहे. फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर एमआय १० आय स्मार्टफोनमध्ये शाओमीने राउंड शेप क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, प्रथम १०८ एमपी सॅमसंग एचएम २ सेन्सर आहे, दुसरा ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा आहे, तिसरा २ एमपी मॅक्रो लेन्सचा आहे तर चौथा एक २ एमपी डीप सेन्सर. तसेच, फोनच्या पुढील बाजूस १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६.६७ इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर उपलब्ध असेल. हे एमआययूआय १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. मी १० आय स्मार्टफोनमध्ये ४,८२० mAh बॅटरी आहे, जी३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटो जी (२०,९९९ रुपये)
६.७ इंचचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनेल मोटो जी ५ जी मध्ये देण्यात आला आहे. पॉवरबॅकसाठी फोनला ५,००० एमएएच बॅटरी आहे. जी २० डब्ल्यू फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज होते. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ४८ एमपीचा असेल. तर ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स समर्थित असतील. यासोबतच २एमपी मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी ८ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५ जी चिपसेटसह येईल. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल.