ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे आज निधन झाले. कोरोनाची असीम बॅनर्जी यांना लागण झाली होती आणि त्यांच्यावर मागील एक महिन्यापासून कोलकातामधील मेडिका सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

ममता बॅनर्जी यांच्या भावाच्या निधनानंतर कुटुंबात दु:खाचे वातावरण आहे. रुग्णालयातून मृतदेह मिळाल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. मेडिका सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लहान बंधु असीम बॅनर्जी आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. ते कोरोनाबाधित होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते.