राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही


मुंबई – राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तथापि, परवानाधारक रिक्षा चालकांकडून काही प्रतिनिधी संघटना मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. सानुग्रह अनुदान परवानाधारक रिक्षा चालकांना त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे.

ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाईल. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.