दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण


कोरोना महामारीने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळे अडकले आहेत. त्यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तो सध्या होम क्वारंटाइन आहे.


आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझे संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही कोरोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा, अशा आशयाचे ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.