भारतातील 28 हजार फ्रेशर्सना IT कंपनी Cognizant देणार नोकरीची संधी


नवी दिल्ली – देशातील अनेकांना कोरोनाच्या संकटकाळात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच काही कंपन्यांना मात्र नवोदितांना नोकरीच्या संधी देत, त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली आहे. अशाच कंपन्यांमधील एक नाव म्हणजे कॉग्निझंट. आईटी क्षेत्रातील एक भारतात 2021 या वर्षात 28,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी देण्याचा निर्णय प्रमुख कंपनी कॉग्निझंटने घेतला आहे. या कंपनीकडून मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 17 हजार जणांना नोकरीची संधी दिली होती. सध्या 2,96,500 कर्मचारी कॉग्निझंटमध्ये कार्यरत आहेत. ज्यापैकी एकट्या भारतात 2 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

याबाबत कंपनीचे सीईओ, ब्रायन हम्फ्रीज यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून एट्रिशनवर भर दिला जात आहे. मागील काही महिन्यांमध्ये आलेल्या राजीनाम्यांच्या धर्तीवर ही वाढ पाहायला मिळेल. कारण, नोटीस पीरियड कालावधी भारतामध्ये 2 महिन्यांचा होता. कंपनीतून राजीनामा देणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही आता येत्या काळात नव्याने आणि मोठ्या संख्येने नवोदितांना या कंपनीत काम करण्याची संधी चालून येणार आहे.

कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मल्टीपार्ट प्लॅनवर कॉग्निझंटकडून काम सुरु आहे. यामध्ये अंतर्गत व्यवस्थापन, प्रशिक्षण उपक्रम, जॉब रोटेशन, आणि अंतर्गत संधींमध्ये वाढ असे अनेक पर्याय कर्मचाऱ्यांसाठी खुले असतील. या माध्यमातून मनुष्यबळावरही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. याशिवाय तिमाही पगारवाढ आणि पद बढती, हाय स्कील डिमांड अशा उपाययोजनाही अंमलात आणण्यात येणार आहे.

कंपनीकडे अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. आता यासाठीच पुन्हा नव्याने या क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी कॉग्निझंटक़डून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.