या देशात दुसऱ्याबद्दल कुरबुर केल्यास होईल शिक्षा


आपल्या देशात म्हणा किंवा जगभरात म्हणा एखाद्या व्यक्तिबद्दल चाललेल्या कुरबुरीला प्रचलित भाषेत गॉसिप असे म्हणतात. पण अशा प्रकारचे गॉसिप फक्त सेलिब्रेटींच्या बाबतीतच केले जातात आणि त्यांच्याबद्दलचे गॉसिप आपण खूप आवडीने वाचतो. पण आता अशा प्रकारचे गॉसिप घरापासून ऑफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात पोहचले आहे.

कित्येकदा या गॉसिपमुळे अफवा देखील पसरल्या जातात. पण आता या गॉसिपमुळे एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. यामुळे गॉसिपवर फलिपिन्ससमधील बिनलोनन मध्ये प्रशासनाने बंदी आणली आहे. त्यामुळे याठिकाणी जर तुम्ही गॉसिप कराल तर तुम्हाला एका शिक्षेला सामोरे जावे लागेल.

लोकांमध्ये आपण काय बोलतो याचे या कायद्यामुळे भान राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून काय बोलतो याचे भान राखायला हवे यासाठी कायदा बनवला आहे.

तुम्ही या कायद्यातंर्गत जर गॉसिप करताना पकडले गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा ७२१ रुपयांचा दंड होईल. त्याचसोबत तीन तासांसाठी रस्त्यावरील कचरा उचलण्याची शिक्षा केली जाईल. जर दुसऱ्यांदा तुम्ही हा कायदा मोडला तर १४00 रुपये दंड आणि 0८ तासांसाठी सामाजिक सेवा करण्याची शिक्षा दिली जाणार आहे.

Leave a Comment