आपल्या आहारामध्ये अवश्य करा मुळा समाविष्ट


आयुर्वेदाच्या अनुसार मुळ्याचा उपयोग स्वास्थ्याच्या दृष्टीने फार मोठा आहे. मुळ्याचा वापर अनेक प्रकारे केला जात असतो. कधी ताजा मुळा कच्चाच खाल्ला जातो, तर कधी त्याचा वापर कोशिंबीर, भाजी, किंवा पराठे बनविण्याकरिताही केला जातो. मुळ्याची पानेही भाजी बनविण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे. मुळ्यामध्ये फायटोकेमिकल्स मुबलक प्रमाणामध्ये असल्याने याच्या सेवनाने शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

मुळ्यामध्ये कर्करोगप्रतिरोधक तत्वे असून, याच्या नियमित सेवनाने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित राहण्यास मदत मिळते. मुळ्यामधी असणारी पोषक तत्वे उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सहायक असतात. तसेच यामध्ये पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये असून, त्यामुळे शरीरातील सोडियम-पोटॅशियमच्या मात्रा संतुलित राहण्यास मदत होते, आणि त्यामुळे पर्यायाने रक्तदाब नियंत्रित राहतो. मुळ्यामध्ये ‘अँँटी कन्जेस्टिव्ह’ तत्वे असल्याने सर्दी-पडसे झाल्यास मुळा खाल्ल्याने लवकर आराम पडतो. याच्या सेवनाने छातीमध्ये साठून राहिलेला कफ कमी होण्यास मदत होते.

मुळ्यामध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये असून, त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने आतड्यांचे कार्य सुरळीत रहात असून, पचनक्रिया सुधारते. मुळ्याच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये साठून राहिलेली विषारी तत्वे बाहेर पडण्यास मदत होते. मुळ्यामध्ये असणारी तत्वे शरीरातील इंस्युलीनची मात्र नियंत्रित करणारी असल्याने याचे सेवन मधुमेहींसाठी उत्तम मानले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment