लग्न कार्यात घुसून लोकांशी गैरवर्तन करणे पश्चिम त्रिपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना भोवले


त्रिपुरा: पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी सुरू असताना एका लग्न कार्यात घुसून सिंघम स्टाईलने कारवाई करणे अंगलट आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना कारवाई करताना जमलेल्या लोकांशी गैरवर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी दिले आहेत.


जिल्हाधिकारी शैलेश कुमार हे संबंधित कारवाई करताना लग्नासाठी जमलेल्या लोकांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. त्यांनी काही लोकांना स्वत: मारल्याचे या व्हिडीओत कैद झाले आहे. त्याचबरोबर उपस्थित महिलांशी उर्मट भाषेत बोलताना, कोणतीही महिला पोलीससोबत नसताना त्या महिलांना अटक करण्याचा आदेश देत असल्याचेही ते दिसत आहेत. पोलिसांनी या कार्यक्रमामध्ये काही लोकांना मारल्याचेही व्हिडीओत कैद झाले आहे.