नरेंद्र मोदींच्या काकू नर्मदाबेन यांचे कोरोनामुळे निधन


अहमदाबाद – कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे निधन झाले आहे. अहमदाबादच्या एका रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. त्या ८० वर्षांच्या होत्या. न्यू रानिप या भागात आपल्या परिवारासोबत त्या राहत होत्या.

यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे. ते म्हणतात की, दहा दिवसांपासून नर्मदाबेन या कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या. नरेंद्र मोदी यांचे काका आणि नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांचे पूर्वीच निधन झाले आहे. आपल्या मुलांसोबत नर्मदाबेन या राहत होत्या.