तुमच्याने सुटते आहे का पहा पुणे पोलिसांनी घातलेले कोडे


पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. अनेक कठोर निर्बंध त्या अंतर्गत लावण्यात आले आहेत. लोकांनी नियम पाळावे यासाठी पुणे पोलीस वेगवेगळ्या पद्धतींने जनजागृती करत आहेत आणि त्यांच्या पद्धती सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत आणि लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

पुणे पोलिसांनी आत्ताही असेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक कोडे घातले आहे. त्यांचे कोडे असे आहे. एका पोलिसाने खालीलपैकी एका व्यक्तीला शिक्षा केली. कोणाला आणि का केली ते ओळखा पाहू.

आज सकाळी ९ वाजता- नितीन, अरुण, रिया आणि राहुल हे एका दुकानात जातात. दुकानदार नितीनला विचारतो,
कसे आहात?” अरुणला विचारतो,
अरे वा मिश्या ठेवल्या!
रियाला म्हणतो, नमस्कार मॅडम
राहुलला म्हणतो, सिगरेट नाही.


पुणे पोलिसांच्या या ट्विटवर अनेकजण रिप्लाय करुन उत्तर देत आहेत. थोडे बघा तुम्हालाही याचे उत्तर देता येते का? दरम्यान पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलीसही यात कमी नाहीत. कोरोना काळात नागरिकांकडून सर्व नियमांचे पालन होत आहे का यावर मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी एक मेसेज दिला आहे. सध्या मुंबई पोलिसांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

नुकत्यात रिलीज झालेल्या राधे चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनचे मुंबई पोलिसांनी मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात तेव्हा, असे म्हणत फोटो शेअर करण्यात आला आहे.

ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डाचा एक डायलॉग आहे. ‘आय लव्ह इट’. रणदीप हुड्डाच्या चेहऱ्याच्या जागी कोरोना व्हायरसचा फोटो लावून मुंबई पोलिसांनी तो शेअर केला आहे. यावर ‘आय लव्ह इट’ लिहण्यात आले. म्हणजेच जर कुणी बिना मास्क बाहेर पडले तर कोरोनाला बळी पडू शकतो असे यातून दर्शवण्यात आले आहे.