तुम्हाला आश्चर्यचकित करीत अशी काही तथ्ये

fact
आपल्या जगामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करतील अशा अनेक गोष्टी आहेत. या वस्तूंशी निगडित तथ्ये अनेकदा आपल्याला नवल वाटायला लावणारी आहेत. एखाद्या देशामध्ये एकच गिनिपिग पाळणे बेकायदेशीर का असावे? किंवा एखाद्याने एखादा देश विकण्यास काढल्याची घटना वास्तवात घडली असावी? आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक परंपरा आपल्या जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहेत. अशाच काही परंपरांच्या विषयी जाणून घेऊ या.
fact1
स्वित्झर्लंड देशामध्ये एकच गिनिपिग पाळणे परंपरेच्याच नाही, तर कायद्याच्याही विरुद्ध आहे. गिनिपिग हा समूहामध्ये अधिक आनंदी राहणारा प्राणी समजला जात असल्याने या प्राण्याला एकट्याने ठेवणे हा अपराध समजला जातो. त्यामुळे गिनिपिग पाळायचीच असतील, तर किमान दोन गिनिपिग पाळली जावीत असा कायदा येथे आहे. गिनिपिग्ज आपापसात अतिशय मिळून मिसळून राहणारे प्राणी असल्याने दोनातील एक गिनिपिग काही कारणाने दगाविले, तर त्याच्या मालकाने तातडीने दुसरे गिनिपिग आणण्याबद्दल स्विस सरकार आग्रही असते.
fact2
दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळी शत्रूदेशांचे अनेक सैनिक युद्धकैदी म्हणून पकडले गेले होते. त्यावेळी कैदेमध्ये असताना अनेक ठिकाणी या युद्धकैद्यांना मरणप्राय यातना दिल्या गेल्या होत्या. असेच अनेक जर्मन सैनिक कॅनडामध्ये युद्धकैदी म्हणून राहत होते. मात्र १९४५ साली विश्वयुद्ध संपल्यानंतर या कैद्यांना जेव्हा मुक्त केले गेले तेव्हा यातील तब्बल सहा हाजार सैनिकांनी कॅनडा सोडून मायदेशी परतण्यास नकार दिला. कारण त्याकाळी कॅनडातील युद्धकैद्यांना काम दिले जात असून, केलेल्या कामाचा पुरेसा मोबदला त्यांना दिला जात असे. कामाच्या सोबत या कैद्यांना मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली होती. युद्धकैदी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले गार्ड्स यांच्यामध्ये आपुलकीचे नाते होते. त्यामुळेच कैदेतून मुक्तता झाल्यानंतर अनेक कैद्यांना आपल्या मायदेशी परतण्याची इच्छा नसून, कैदेतील दिवस आपले सर्वात आनंदाचे दिवस असल्याचे अनेक कैदी म्हणत असत.
fact3
अनेक चित्रविचित्र वस्तू आजकाल ऑनलाईन विक्रीस उपलब्ध असतात. काही काळापूर्वी एका वेबसाईटवर सुप्रसिद्ध अभिनेता-गायक असलेल्या जस्टीन टिम्बरलेकने अर्धवट खाल्लेले सँडविच विक्रीसाठी उपलब्ध होते. यालाही मागे टाकणारी एक गोष्ट ऑनलाईन विक्रीकरिता उपलब्ध होती. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरामध्ये राहणाऱ्या एका मनुष्याने २००६ साली चक्क संपूर्ण न्यूझीलंड देशच ऑनलाईन विकण्यास काढला होता. ‘सर्वसामान्य हवामान असलेला’ आणि ‘अमेरिकन चषकाचा विजेता’ असे या विक्रीस उपलब्ध असलेल्या देशाचे वर्णन केले गेले असून, ऑनलाईन सुरु असलेल्या या लिलावाची सुरुवातीची किंमत केवळ एक सेंट होती. सरतेशेवटी बावीसवेळा बोली लावली गेल्यानंतर न्यूझीलंडच्या विक्रीची किंमत तीन हजार डॉलर्सपर्यंत आली होती.

Leave a Comment