जगाला ज्ञान शिकवणारी कंगना मास्क न घातल्यामुळे झाली ट्रोल


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना अनेक वेळा दिसते. यामुळे बऱ्याचवेळी कंगना ट्रोल देखील झाली आहे. कोरोनाच्या काळात सुरक्षित राहा सांगणारी कंगना आता मास्क न घालता बाहेर जाताना दिसत असल्यामुळे कंगना पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.


बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने कंगनाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. कंगना या व्हिडीओत मुंबईतील डबिंग स्टुडिओत मास्क न घालता जाताना दिसत आहे. कंगनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कंगनाने पहिल्यांदा फोटोग्राफर्ससाठी पोज देण्यास नकार दिला होता. पण, स्टुडिओमध्ये प्रवेश करण्याआधी तिने फोटोग्राफर्ससाठी पोज दिली.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल केले आहे. त्यावरुनच सेलिब्रिटीपासून सामान्य जनतेने ही ट्रोल केले आहे. अभिनेता सुयश राय म्हणाला, जगाला ज्ञान द्यायचं असते, तर सगळ्या पुढे असतात, पण मुर्ख लोक अशी असतात, अशी कमेंट करत त्याने कंगनाला ट्रोल केले आहे. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील कंगनाला ट्रोल केले आहे. ती म्हणाली, मास्क ती कधीच परिधान करत नाही, एवढेच काय तर तिच्या हातात सुद्धा मास्क नाही. हे कसे शक्य आहे? असेच प्रश्न विचारत अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केले आहे.