ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते; अमेरिकन महिलेचा गौप्यस्फोट


न्यूयॉर्क – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अमेरिकेतील एका महिलाने गंभीर आरोप केले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते, असा गौप्यस्फोट उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने एका मुलाखती दरम्यान केला. जॉन्सन यांच्याविरोधात या प्रकरणासंदर्भात चौकशीही सुरु झाली आहे. जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१६ असे चार वर्ष जॉन्सन आणि त्यांचे नाते होते. जॉन्सन हे याच कालावधीमध्ये लंडनचे महापौर होते. त्यांनी आपली आधीची पत्नी मरीना व्हीलर यांच्याशी पुन्हा विवाह केला होता.

जेनिफरने ‘द मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्या बोरिस जॉन्सन यांना मी ओळखते होते, त्याचे अस्तित्वच आताच्या पंतप्रधानांमध्ये दिसून येत नसल्याचे म्हटले आहे. या दोघांमधील नात्यासंदर्भात माहिती २०१९ मध्ये पहिल्यांदा समोर आली, तेव्हा मला मदत करण्यास बोरिस जॉन्सन यांनी नकार दिल्याचा दावाही जेनिफरने केला आहे. आमची पहिल्यांदा भेट २०११ साली एका कार्यक्रमामध्ये झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी महापौर पदाच्या पोटनिवडणुकींसाठीच्या प्रचारामध्ये मी बोरिस यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केल्याचेही जेनिफरने सांगितले आहे. लंडनमधील जेनिफर यांच्या घरीच पहिल्यांदा दोघांनी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा जेनिफरने केला आहे. आम्ही दोघेही एकमेकांकडे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आर्कर्षित झाल्याचेही जेनिफरने म्हटले आहे.

लंडनमधील एका रेस्तराँमध्ये बोरिस यांनी आपल्याला प्रपोज केल्याचेही जेनिफरने म्हटले आहे. मला तुला डेट करायचे असल्याचे बोरिस यांनी मला एका रेस्तराँध्ये सांगितले. २०१२ च्या लंडन पॅराऑलम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या काही वेळ आधीच बोरिस यांच्यासोबत मी शोरेडिच फ्लॅटमध्ये पहिल्यांदा सेक्स केल्याचा दावा जेनिफरने केला आहे. आम्ही एकमेकांना सेक्शुअल फोटोही पाठवायचो, असेही जेनिफरने म्हटले आहे. अनेकदा तर बोरिसच्या कामाच्या वेळेतही मी त्याला फोटो पाठवायचे. आमचे अफेअर सुरु असताना मी अनेकदा त्याला टॉपलेस फोटोही पाठवल्याचे जेनिफरने बोरिस यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलताना म्हटले आहे. बोरिस यांच्यापेक्षा जेनिफर ही २१ वर्षांनी लहान आहे. अनेकदा आम्ही एकाच खोलीत झोपायचो, असेही जेनिफरने सांगितले आहे.