अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटाच्या चित्रकरणात रणवीर व्यस्त असल्यामुळे निर्माता करण जोहरने त्यामुळे त्याचा ‘तख्त’ या चित्रपटाचा प्रोजेक्ट पुढे ढकलला आहे. रणवीरसोबत ‘तख्त’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट आहे. पहिल्यांदा ‘गल्ली बॉय’ चित्रपटामध्ये रणवीर आणि आलियाची जोडी एकत्र दिसली होती. या दोघांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा आलिया आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटातून इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
करण जौहरच्या मदतीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार सैफ अली खानचा मुलगा
यासंदर्भात ‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात इब्राहिम केवळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. फक्त चित्रपट निर्मितीची प्रक्रिया त्याला शिकायची आहे. त्याला लाँच करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. तो आता त्याचे शिक्षपूर्ण करत आहे. इब्राहिमला अभिनेता व्हायचे आहे, पण त्याआधी त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तो इतक्यात पदार्पण करणार नाही. रॉम-कॉम चित्रपट करण जोहरचे ‘धर्मा प्रोडक्शन’ हा तयार करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: करण करणार आहे. या चित्रपटात इब्राहिम अली खान सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे.