कोरोना लसीकरणासाठी 45 वर्षावरील नागरिकांसाठी महत्वाची अट


नवी दिल्ली – कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले असून उद्यापासून देशातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. आता 45 वर्षांपुढील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. पण यासाठी फक्त तुम्हाला 45 वर्षे पूर्ण झाली म्हणून लस देण्यात येणार आहे, असे नाही तर यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. या जन्मतारखेपूर्वी तुमचा जन्म झाला असेल तरच तुम्हाला ही लस मिळणार आहे.

लसीकरणासाठी नोंदणी करण्यास जाण्यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे 1 जानेवारी 2021 ला 45 वर्षे व्हायला हवे. तसेच 1 जानेवारी, 1977 आधी या नागरिकाचा जन्म झालेला असायला हवा. तुमचा जन्म जर या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्हाला लस मिळणार आहे. काही दिवसांनी सरकार ही अट काढून टाकण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु झाले होते. तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरिअर्सना लस टोचली गेली. त्यानंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती. यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती. दरम्यान लस टोचलेल्याचे सर्टिफिकेट न मिळाल्यास 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देता येणार आहे. हे सर्टिफिकेट डिजिटलदेखील असणार आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासावेळी हे सर्टिफिकेट पाहिले जाणार आहे. अन्य ठिकाणीही हे सर्टिफिकेट लागू केले जाऊ शकते.