भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य


नवी दिल्ली : महिलांच्या जीन्स घालण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाचा परिचय करुन दिला आहे. भारत तब्बल 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता. ज्या अमेरिकेने जगावर राज्य केले, तिच अमेरिका आता कोरोना काळात संघर्ष करत आहे. अमेरिकेने नाही तर ब्रिटनने भारतावर राज्य केले होते.


ज्यांनी आपत्ती काळात अधिक मुलांना जन्म दिला, त्याला अधिक मदत मिळाली आणि ज्यांनी कमी मुलांना जन्म दिला. त्यांना कमी मदत मिळाली, असे विचित्र वक्तव्य ही तीरथ सिंह रावत यांनी केले आहे.

महिलांच्या कपड्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. फाटलेली जीन्स आजकालच्या महिला घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळे समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असते, असे तीरथ सिंह यांनी म्हटले होते.