मुंबई : इंजिनिअर पदाच्या भरतीसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने नोटिफिकेशन जाहीर केले आहे. एकूण 200 पदांवर ही भरती केली जाणार आहे. 3 मार्चला हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने नोटिफिकेशन जारी केले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे. 1 लाख 60 हजार रुपये मासिक वेतन निवड होणाऱ्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये इंजिनिअर्सच्या 200 पदांसाठी भरती, मिळणार 1.6 लाख पगार
हिंदुस्थान पेट्रोलियममधील ही भरती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. अर्ज करण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना हिंदुस्थान पेट्रोलियम अधिकृत संकेतस्थळ hindustanpetroleum.com ला भेट द्यावी लागणार आहे. 15 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
इंजिनिअरच्या 200 जागासांठी हिंदुस्थान पेट्रोलियमने भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरसाठी 120, सिव्हील इंजिनिअरसाठी 30, इलेक्ट्रिकल इंजिनिअर 25 आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर पदासाठी 25 जागा आहेत. अधिक माहितीसाठी एचपीसीएलच्या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी.
अशा प्रकारे कराल अर्ज?
- सर्व प्रथम तुम्हाला हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर होम पेजवर Career सेक्शनमध्ये जावे.
- त्याठिकाणी View Available Positions या लिंक पर क्लिक करावे लागेल.
- तसेच तिथे असलेल्या Our Current Openings वर जावे.
- पुढे Engineering Roles च्या समोरील ‘Click here to apply” लिंक वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची फी भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर पदाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणे आवश्यक आहे. एसी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना अर्जाचे शुल्क म्हणून 1000 आणि जीएसटीचे 180 असे एकूण 1180 रुपये फी भरावी लागणार आहे.