नेटफ्लिक्सच्या नव्या नियमामुळे फुकट्यांची होणार पंचाईत


मुंबई : भारतात नेटफ्लिक्स मुख्य युझरला अकाऊंटचा पासवर्ड शेअर न करण्यासाठी नवीन फीचर तयार करत असून या फिचरनुसार नेटफ्लिक्सवर लॉग इन करण्यासाठी मुख्य अकाऊंट होल्डरला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजवर पाठवलेली माहिती लॉग इन करताना भरावी लागते. पण अनेकजण एकाच सबस्क्रिप्शनवर नेटफ्लिक्सचा आनंद घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा बदल करण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला. नेटफ्लिक्स केवळ ऑथराईज्ड यूझरला पाहता यावे, यासाठी ही सिस्टीम असल्याचे नेटफ्लिक्सने सांगितले आहे. सध्या याची चाचणी सुरू असल्याचे कळते.

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला माहिती मिळाली की, नेटफ्लिक्सच्या यूजर्सच्या संख्येत कोरोना संक्रमणाच्या काळात वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सच्या यूजर्सची संख्या गेल्या महिन्यात 20 कोटीपेक्षा अधिक झाली आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. घरीराहून देखील 2021 साली प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सवरील सिरीजवर फार कमी वेळ घालवताना दिसले.

नेटफ्लिक्स ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा कंपनी असून कायमच नवे नवे फिचर नेटफ्लिक्स टेस्ट करत असते. नेटफ्लिक्सचे टर्म्स ऑफ सर्व्हिसचे म्हणणे आहे की, एका अकाऊंटवरून लॉगइन करणारे यूझर्स एकाच घरात असले पाहिजे. या गोष्टीला कंपनीने नकार दिला आहे की,ते शेअरिंग संदर्भात कोणता मोठा निर्णय घेणार आहे.