आदिदासने बनविले जगातील सर्वाधिक लांब बूट

पादत्राणे क्षेत्रातील नामवंत कंपनी आदिदासने जगातील सर्वाधिक लांब बूट जोडे नुकतेच लाँच केले आहेत. या बुटाच्या लांबीची कल्पना करणे सहज शक्य नाही. काळा आणि पांढरा अश्या रंगात हे बूट बनविले गेले असून सोशल मीडियावर ते ट्रेंड करत आहेत.

हिपहॉप फॅशन सर्वसामान्य लोकांना समजणे अवघड आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून हे बूट सांगता येतील. एस्टोनियन रॅपर टॉमी कॅशने याने हे बूट डिझाईन केले असून त्यांची लांबी १ मीटर म्हणजे तीन फुटापेक्षा जास्त आहे. आणखी एक विशेष म्हणजे यातील एक बूट काळा तर दुसरा पांढरा आहे. सुपरस्टार कॅम्पेन मध्ये हे बूट डिझाईन केले गेले आहेत. या मोहिमेत ब्रांडला संगीतकारांच्यासह मिळून नवीन शु रेंज मिळते.

या शूज विषयी बोलताना कॅश म्हणतो, मी प्रथम जेव्हा आदिदासला मला जगातील सर्वाधिक लांबीचे शूज डिझाईन करायला आवडेल असे सांगितले तेव्हा कंपनीला थोडी शंका होती. परी आणि सैतान दोघेही एकाचवेळी माझ्या सोबत असतात आणि सतत एकमेकांशी लढतात. त्याचे प्रतिक म्हणून पांढरा आणि काळा असे दोन रंग वापरले गेले आहेत. सोशल मीडियावर या बुटांवर प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.