पुणे : ‘दगडूशेठ’ हलवाई गणपतीला समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी दान केलेला सोन्याचा हार ‘सीआयडी’ने ताब्यात घेतला असून मोतेवारने हा हार २०१३ मध्ये दगडुशेठला दान केला होता. हा हार तब्बल दीड किलो सोन्याचा होता त्याची किंमत ६० लाखांवर आहे. ही कारवाई धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून केली आहे.
‘दगडूशेठ’ला महेश मोतेवारने चोरीच्या पैशातून दान केला होता दीड किलो सोन्याचा हार
विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील लाखो गुंतवणुकदारांना समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने तब्बल २५१२ कोटींचा गंडा घातला होता. मोतेवारची २०७ कोटींची प्रॉपर्टी याप्रकरणी ईडीने जप्त केली होती. या प्रकरणात मोतेवारला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
सीआयडी डीवायएसपी मनिषा पाटील याप्रकरणी बोलताना म्हणाल्या; मोतेवारच्या पैशांचीची ट्रेल शोधत असताना या हाराविषयी आम्हाला माहिती मिळाली. हा हार लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच घेतल्याचे सिद्ध झाल्यानंतर आम्ही ट्रस्टशी बोलुन हा हार ताब्यात घेतलेला आहे. या हाराची किंमत ६० लाख ५० हजार असल्याचे स्पष्ट झाले असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची पुढील कार्यवाही होईल.