एमपीएससी परीक्षेसंदर्भात पंकजा मुंडेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुण्यात संतप्त झाले आणि लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

दरम्यान, विध्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विध्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. दरम्यान, यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या, हे अगदी चुकीचे असल्याचे म्हटले आहे.


ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यांनी ज्यामध्ये म्हटले आहे की, एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या, हे अगदी चुकीचे आहे. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी हे शहरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असतात. अभ्यासिका जॉईन करून रात्रांदिवस अभ्यास करतात. अचानकपणे परीक्षा रद्द करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मला वाटत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे कोरोना नियमांच्या अखत्यारित राहून चालू आहेत, मग एमपीएससीची परीक्षा का नाही असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द केल्याने अनेक मुलाचे नुकसान होईल, त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होईल. हा निर्ण्याबाद्द्ल मी तीव्र नापसंती व्यक्त करत असल्यायचे देखील मुंडे यांनी म्हटले आहे.