तुम्ही चाखून पाहिलीत का ही खास भारतीय चीझ ?

chesse
सध्या आपल्याकडील अनेक खाद्यपदार्थांमध्ये चीझचा वापर केला जात असतो. पास्ता, पिझ्झा पासून ते अगदी पावभाजी, पराठा आणि पकोडा इथपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये चीझचा वापर केला जात असतो. मोझ्झारेला, चेडर हे पाश्चात्य चीझचे प्रकार आता आपल्या स्वयंपाकघरांमध्येही सहज दिसू लागले आहेत. पण ही पाश्चात्य चीझ भारतामध्ये लोकप्रिय होत असताना भारताच्या काही प्रांतांमध्येही काही खास चीझ गेल्या अनेक दशकांपासून तयार केली जात आहेत. या चीझच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊ या.
chesse1
‘कालारी चीझ’ ही जम्मू आणि काश्मीर प्रांताची खासियत असून, या चीझला गरम केले गेल्यावर मोझ्झारेला प्रमाणेच तार येऊ लागते. या चीझचा वापर करून बनविण्यात आलेला ‘कालारी कुलचा’ ही या प्रांताची खासियत आहे. कुलचा बनविताना त्यामध्ये हे चीझ ‘स्टफ’ करून हा कुलचा बनविला जातो. पांढऱ्या रंगाचे, थोडी तुरट चव असणाऱ्या ‘कलीम्पॉन्ग चीझ’ला त्याचे नाव पश्चिम बंगाल येथील सुप्रसिद्ध हिल स्टेशन कलीम्पॉन्ग या ठिकाणच्या नावावरून पडले आहे. हे चीझ सर्वप्रथम सिक्कीममध्ये राहणाऱ्या अब्राहम नामक पाद्र्याने बनविले होते.
chesse2
‘चुरू चीझ’ हे काहीसे उग्र चवीचे ‘ब्ल्यू चीझ’ असून, हे अनेक हिमालयन प्रांतांमध्ये, विशेषतः सिक्कीममध्ये वापरले जाते. ‘छेना चीझ’ हा चीझचा प्रकार काहीसा पनीरप्रमाणे दिसणारा असून, याचा वापर अनेक बंगाली आणि ओडिया मिठायांमध्ये होतो. ‘टोपली ना पनीर’ हा चीझचा प्रकार पारशी खाद्यसंस्कृतीची खासियत आहे. अतिशय मुलायम असे ही चीझ पानांच्या लहान लहान टोपल्यांमध्ये बनविले जात असून, नववर्षाच्या आणि विवाहप्रसंगांच्या निमित्ताने ‘स्टार्टर’ म्हणून सर्व्ह करण्याची पद्धत आहे.

Leave a Comment