निवडणुकीपूर्वी व्ही.के. शशिकला यांचा राजकीय संन्यास !


चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी व्ही.के. शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सहा एप्रिलला तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक (DMK) सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (दिवंगत) यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला यांनी ‘राजकीय शत्रू’ द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. सत्ताधारी एआयएडीएमके-भाजप युतीच्या विरोधात एमके स्टालिन यांचा डीएमके पक्ष लढत आहे. डीएमकेने निवडणुकीत काँग्रेस व इतर पक्षांशी युती केली आहे.

आपल्या पत्रात शशिकला यांनी म्हटले आहे, माजी मुख्यमंत्री जे जयललिता जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतरही मी तसे करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल अशी मी प्रार्थना करते. त्या पुढे म्हणाल्या, की मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. जयललिता आणि तमिळनाडूच्या जनतेचे मी नेहमी कृतज्ञ आहे.

28 जानेवारी रोजी एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एआयएडीएमकेचे निष्कासित नेत्या व्ही. के. शशिकला या चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. तेव्हापासून अशी अटकळ होती की सत्तारूढ एआयएडीएमके आणि विरोधी पक्ष डीएमकेला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान देतील. अद्याप तरी त्यांनी आपले पत्ते खोलले नाही. जे जयललिता यांचे डिसेंबर 2016 मध्ये निधन झाले. यानंतर एआयएडीएमकेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. अन्नाद्रमुकच्या पन्नेरसेल्वम गटाने शशिकला यांना पक्षातून काढून टाकले.