8 मार्चपासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात


मुंबई – 8 मार्चपासून मुंबईत एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. या परीक्षा केवळ ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येतील. ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचे, महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेसने म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी परीक्षा ऑनलाइन करण्याचे आवाहन केले होते. पण राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने एमयूएचएस ऑनलाईन परीक्षा घेण्यास नकार दिला.

एमयूएचएस परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी या संदर्भात एका मीडिया रिपोर्ट अहवालात म्हटले आहे की, राज्यभरात विविध प्रकारची क्षेत्रे आहेत, ज्यात बरीच महाविद्यालये दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण निर्णाम होऊ शकते. त्यामुळे केवळ ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

नुकतेच एमबीबीएससह इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेजने यूजी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक रिशेड्यूल केले आहे. या परीक्षा यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु, आता या परीक्षा 8 मार्चपासून सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा 23 मार्चपासून सुरू होतील.

एमयूएचएस परीक्षेचे नियंत्रक अजित पाठक यांनी या संदर्भात सांगितले की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता या परीक्षा घेण्यात येणार आहेत. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.