मुंबई – कार्यालय परिचरच्या (Office Attendant) भरतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिसूचना जारी केली आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.gov.in वर या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 841 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जामध्ये त्रुटी किंवा कमतरता आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
महाराष्ट्रातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी. विशेष म्हणजे या पदांवर बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- निवड प्रक्रिया – ऑनलाइन लेखी परीक्षा व भाषा परीक्षेच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
- वयाची अट – या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
- महत्त्वाच्या तारखा – ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 24 फेब्रुवारी 2021
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 मार्च 2021
- ऑनलाईन परीक्षेची अपेक्षित तारीख – 9 किंवा 10 एप्रिल 2021
- अर्जाची फी – अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी वर्गातील आणि ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांना 450 रुपये फी भरावी लागते. त्याचबरोबर एसटी आणि दिव्यांगसाठी 50 रुपये शुल्क निश्चित केले गेले आहे.