येत्या 1 एप्रिलपासून ग्रॅच्युटी, पीएफ आणि काम करण्याच्या वेळेत होणार मोठा बदल


नवी दिल्ली – ग्रॅच्युटी, पीएफ आणि काम करण्याच्या वेळेत येत्या 1 एप्रिलपासून मोठा बदल होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमध्ये वाढ होणार आहे. पण तुमच्या हातात येणाऱ्या पैशात मात्र घट होणार आहे. यामुळे कंपनीच्या बॅलेन्स शीटवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसून येणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजेच गेल्या वर्षात संसदेत पास करण्यात आलेले Code on Wages बिल आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून हे विधेयक लागू होण्याची शक्यता आहे.

मजूरीच्या नव्या वाख्येनुसार भत्ते हे एकूण वेतनाच्या 50 टक्के असणार आहेत. म्हणजेच मूळ वेतन एप्रिलपासून एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावे. दरम्यान अशा पद्धतीने देशात 73 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रम कायद्यात बदल केले जाणार आहेत. दरम्यान सरकारने असा दावा केला आहे की, मालक आणि कामगार या दोघांना सुद्धा याचा फायदा होणार आहे.

नव्या प्रस्तावानुसार, मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50 टक्के असावे. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल होणार आहे. कारण वेतनाचा भत्त्या व्यतिरिक्त भाग हा एकूण वेतनाच्या 50 टक्के कमी असतो. तर एकूण वेतनात भत्त्याचा हिस्सा अधिक वाढतो. मुळ वेतन वाढल्याने तुमचा पीएफ सुद्धा वाढणार आहे. पीएफमुळे वेतनावर आधारित असतो.

त्याचसोबत ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये योगदान वाढल्याने निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रक्कमेत वाढ होणार आहे. यामुळे निवृत्तीनंतर लोकांना आरामदायी जीवन जगता येणार आहे. उच्च वेतन मिळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनात सर्वाधिक मोठा बदल होणार आहे. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्याने कंपनीच्या किंमतीत सुद्धा मोठी वाढ होणार आहे. कारण त्यांना कर्मचाऱ्यांच्या पीएफसाठी अधिक योगदान द्यावे लागणार आहे.

1 एप्रिल पासून बआणखी एक महत्वाचे म्हणजे कामाच्या वेळेत सुद्धा दल केला जाऊ शकतो. कामकाज 12 तासांचे होऊ शकते. ओएसच कोडच्या ड्राफ्टमधील नियमात 15-30 मिनिटांच्या दरम्यान अतिरिक्त काम हे 30 मिनिटे मोजून त्याचे ओव्हरटाइममध्ये समावेश होणार आहे. सध्याच्या नियमात 30 मिनिटांहून अधिक कमी वेळेला ओव्हरटाइम म्हटले जात नाही. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने 5 तासांपेक्षा अधिक वेळ सातत्याने काम करु शकत नाही. त्यावर तसे निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक पाच तासानंतर अर्धा तासांचा ब्रेक देणे अत्यावश्यक असणार आहे.