एलन मस्कची Starlink कंपनी भारतात देणार वेगवान इंटरनेट सेवा, सुरु झाले प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशन


नवी दिल्ली – आता भारतात रिलायन्स जिओ आणि अन्य टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलन मस्क आहेत. लवकरच भारतात एलन मस्क यांची दुसरी कंपनी starlink इंटरनेट सेवा सुरू करणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशनही सुरू झाले आहे. SpaceX Starlink इंटरनेटची सेवा कंट्रोल करते, SpaceX ही एक एअरोस्पेस कंपनी असून मस्क यांनी 2002 मध्ये अंतराळात शोध व सेवा देण्यासाठी SpaceX ची स्थापना केली होती. ही कंपनी सॅटेलाइट्सद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

Starlink इंडियाची वेबसाइट भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी लाइव्ह झाली असून बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरू होऊ शकते. पण, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. https://www.starlink.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बूकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे.

99 डॉलर म्हणजे जवळपास 7 हजार 300 रुपये प्री-बूकिंगसाठी सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील, हे पैसे राउटर आणि अन्य बाबींसाठी असतील. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लोकेशनवर बूकिंग कन्फर्म होईल. सिक्युरिटी म्हणून दिलेले पैसे १०० टक्के रिफंडेबल आहेत, म्हणजे बूकिंग केल्यानंतरही तुम्ही बूकिंग रद्द करु शकतात, तुम्हाला सर्व पैसे परत दिले जातील.

दरम्यान, 50-150Mbps चा स्पीड सुरूवातीला बीटा टेस्टिंगदरम्यान ग्राहकांना मिळेल. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल, असे यापूर्वी मस्क यांनी सांगितले होते. Starlink द्वारे जगभरात इंटरनेट सेवा देण्याची मस्क यांची योजना आहे.