मार्च महिन्यात ‘एवढे’ दिवस बंद असणार बँका


मुंबई : सर्वसामान्य नागरिकांवर बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांचा परिणाम होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बँकेला असलेल्या सुट्ट्या माहिती असणे गरजेचे आहे. बँकेशी संबंधित आवश्यक कामे असतील तर ती लवकर करुन घ्या कारण या महिन्यात विविध राज्यातील बँका जवळपास 11 दिवस बंद असणार आहेत.

या महिन्यात बँकांना वेगवेगळ्या राज्यात 11 दिवसांची सुट्टी असेल. या 11 सुट्ट्यांमध्ये 4 रविवारी साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे, तर दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. याशिवाय बँक कामगारांच्या संपामुळेही बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

विविध राज्यात या दिवशी बंद असतील बँका

  • मिझोरममध्ये 5 मार्च 2021 रोजी सुट्टी असणार आहे. ही सुट्टी चापचर कुट सणानिमित्त आहे.
  • 7 मार्च 2021 रोजी दिवशी रविवार आहे. या दिवशी साप्ताहिक सु्ट्टी असणार आहे.
  • महाशिवरात्रीची 11 मार्च 2021 रोजी सुट्टी असणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, कश्मीर, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमधील बँकांना या दिवशी सुट्टी असणार आहे.
  • 13 मार्च 2021 रोजी दुसरा शनिवारनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
  • 14 मार्च 2021 रोजी रविवार असल्यामुळे या दिवशी साप्ताहिक सुट्टी असणार आहे.
  • चार बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15-16 मार्च 2021 रोजी बँकांचे आंदोलन आहे.
  • 21 मार्च 2021 रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
  • बिहारचा स्थापना दिवस 22 मार्च 2021 रोजी असल्यामुळे बिहारमधील बँका बंद असतील.
  • 27 मार्च 2021 रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.
  • 28 मार्च 2021रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
  • 29 मार्च 2021 रोजी होळी असल्यामुळे यादिवशी सुट्टी असणार आहे. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओड़िशा, पंजाब, उत्तराखंड, सिक्किम, तेलंगणा, मणिपूर, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ़, झारखंड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद असतील.
  • बिहारमध्ये होळीची दोन दिवस सुट्टी असते. त्यामुळे 29, 30 मार्च रोजी बँका बंद राहतील.