राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात


मुंबई : आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल मराठीमध्ये केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य सरकार कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवाद बाबत सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिक न्याय देण्यासाठी काम करत असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

कोरोनासाठी राज्यात विविध उपाययोजना राबवल्या आहेत. धारावी सारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सरकारकडून राबवण्यात आली. विशेष सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाची लढाई अजून सुरुच आहे. मी जबाबदार ही मोहीम सुरू असून राज्यात लसीचा लसीचा कोटा वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरवठा केला जात असल्याचे ते म्हणाले.

कोरोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आपल्याला काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने कोरोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.