प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या या फळांचा आपल्या आहारामध्ये करा समावेश

food
मानवी शरीराचे ‘बिल्डींग ब्लॉक्स’ म्हणून प्रथिने ओळखली जात असतात. प्रथिनांचे सेवन केल्यानंतर यांचे रूपांतर अमिनो अॅसिड्स मध्ये केले जात असते. ही अमिनो अॅसिड्स शरीरातील अनेक महत्वाच्या प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. स्नायूंचे निर्माण, त्यांची बळकटी, त्वचा आणि इतर कनेक्टीव्ह टिश्यू यांच्या बळकटीसाठी देखील ही तत्वे आवश्यक असतात. प्रथिनांच्या योग्य सेवनाने भूक नियंत्रणामध्ये राहून त्यामुळे अतिरिक्त वजन घटण्यासही मदत होते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रथिनांनी परिपूर्ण असलेली काही फळे अवश्य समाविष्ट करावीत.
food1
शंभर ग्राम पेरूमध्ये २६० मिलीग्राम प्रथिने असतात. तसेच पेरूमध्ये क जीवनसत्व, लायकोपीन, आणि अँटीऑक्सिडंटस् मुबलक मात्रेमध्ये असतात. ही सर्व तत्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास सहायक आहेत. पेरूमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सहायक आहे. तसेच हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेले फळ असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील या फळाचे सेवन उत्तम आहे. जर्दाळू या फळामध्ये कॅलरीज कमी असून, यामध्ये फायबरची मात्र अधिक आहे. ही फळे ताजी किंवा वाळविलेली अश्या रूपामध्ये खाल्ली जाऊ शकतात. उत्तम दृष्टी आणि त्वचा यांच्यासाठी या फळाचे सेवन चांगले आहे. शंभर ग्राम जर्दाळूमध्ये १४० मिलीग्राम प्रथिने आहेत.
food2
सुकविलेले अलूबुखारे देखील प्रथिनांनी परिपूर्ण आहेत. यांना प्रून्स या नावाने ओळखले जाते. शंभर ग्राम प्रून मध्ये २२० मिलीग्राम प्रथिने आहेत. तसेच यामध्ये अ जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये आहे. या फळाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. हाडांची बळकटी आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील हे फळ चांगले आहे. त्याचप्रमाणे अव्होकाडो आणि फणस या फळांमध्ये देखील प्रथिने मुबलक मात्रेमध्ये आहेत. या फळांमध्ये जीवनसत्वे आणि फायबर मोठ्या मात्रेमध्ये आहेत. त्यामुळे या फळांच्या सेवनाने भूक लवकर शमते.

Leave a Comment