लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटात येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे आज रिलीज झालेल्या पोस्टरवरुन स्पष्ट झाले असून त्यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
शिवजयंती मुहूर्तावर प्रवीण तरडेंच्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण प्रवीण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा शिवजयंतीच्या मुहूर्तावर झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत उर्वीता प्रोडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात कोण? या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना आज मिळाले आहे. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्याबद्दलचे मोठे औत्सुक्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.
संवेदनशील, सामाजिक अशा प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केल्यामुळे प्रवीण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा तरडे यांनी केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.