स्वदेशी बनावटीचे Sandes अॅप देणार व्हॉट्सअॅपला टक्कर


जगभरात प्रसिद्ध आणि सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपच्या नवीन वर्षात प्रायव्हसी पॉलिसी धोरणाबबातची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच मनात या अॅपबाबत संभ्रमाची परिस्थिती उभी राहिली. त्यानंतर या अॅपसाठी अनेक पर्यायही उभे राहिले. या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कित्येकांनी तर व्हॉट्सअॅपकडे पाठ फिरवत या पर्यायांना पसंतीही दिली.

आता आणखी एक नाव मेसेजिंग अॅपच्या याच नव्या यादीमध्ये जोडले जात आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आणि भारत सरकारतर्फे सर्वांसाठी सेवेत आणल्या जाणाऱ्या या अॅपचे ‘संदेस’ (Sandes) असे नाव आहे. Sandes हे अॅप तयार करण्यात आले असून, सध्या त्याची विविध स्तरांवर चाचणी सुरु आहे. प्राथमिक स्तरावर हे अॅप सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरात असून चाचणीचे टप्पे पार केल्यानंतर ते सर्वांच्या सेवेत येणार आहे.

व्हॉट्सअॅपकडून नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केल्यानंतर अॅप वापणाऱ्या अनेकांमध्येच संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. असंख्य प्रश्नही अनेकांच्या मनात उभे राहिले. याच पार्श्वभूमीवर संदेस हे अॅप तयार करण्यात आले. या अॅपमध्ये गोपनीयतेसाठी साईन इन करतेवेळी ओटीपीचा वापर करण्यात येणार आहे. Government instant messaging system असेही नाव या अॅपला देण्यात आले आहे.

चॅटिंग, मेसेजिंगसह वॉईस कॉलिंगचेही फिचरनेशनल इन्फॉर्मेटिक्स सेंसरकडून नियंत्रीत केल्या जाणाऱ्या Sandes App मध्ये देण्यात आले आहे. युजर्सना यामध्ये साईन इन करण्यासाठी तीन पर्याय मिळणार आहेत. एलडीएपी, साईन इन Sandes ओटीपी आणि Sandes वेबच्या माध्यमातून अॅप वापरु शकणार आहात. यापैकी कोणाही एका पर्यायाचा वापर करत युजर्सना ओटीपी मिळवत अॅप वापरता येईल.