10 वी उत्तीर्ण उमेदवारांना आता थेट रेल्वेतील 3119 पदांसाठी नोकरीची संधी


मुंबई: जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक पदांसाठी भारतीय रेल्वेमध्ये भरती सुरू आहे. विविध पदासांठीच्या अप्रेंटिससाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, वेस्ट सेंट्रल रेल्वेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 3119 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ज्यांना या पदांवर अर्ज करायचा असल्यास त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वेच्या या विभागात अशी होणार नोकरभर्ती
वेस्ट सेंट्रल रेल्वे : 561 पदे
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्पोर्टस कोटा : 26 पदे
सेंट्रल रेल्वे : 2532 पदे

पात्रता – या पदांसाठी आयटीआय आणि आयटीआय नसलेले दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत.

वयोमर्यादा : 15 ते 25 वर्षे

अर्ज करण्यासाठी असणार या कागदपत्रांची आवश्यकता
काही स्कॅन केलेले कागदपत्र रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे. तुम्हाला अर्ज करताना ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

1. पासपोर्ट साईज फोटो
2. उमेदवारांची स्वाक्षरी
3. 10 वी उत्तीर्ण सर्टिफिकेट
4. आयटीआय उत्तीर्ण सर्टिफिकेट

अर्ज करण्याची अंतिम तारीख – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2021, मध्य रेल्वे मधील पदासांठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च तर, वेस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये अर्ज करण्याची तारीख 27 फेब्रुवारी आहे.

अशाप्रकारे होणार निवड – मेरीटच्या आधारावर उमेदवारांची निवड होणार आहे. उमेदवारांचे मेरीट त्याचे 10वीचे गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांवर ठरवले जाईल. या भरती पक्रियेसाठी कोणतीही लिखीत परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.