राज कपूर यांचे पूत्र अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. ही माहिती अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

माझा धाकटा भाऊ आज मी गमावला आहे. या जगात आता तो नाही. त्याला वाचवण्याचा डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केला. पण त्याचे प्राण वाचवता आले नाही. आता मी रुग्णालयात आहे आणि त्याचे शव मिळण्याची वाट पाहत असल्याची पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून राजीव कपूर यांनी कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनदेखील केले होते.