Video : उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या तोंडाला शिवसैनिकांनी फासले काळे


पंढरपूर : पंढरपूरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत टीका केल्याने शिवसैनिकांकडून काळे फासत त्याला साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियात याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार म्हणजे शिवसेनेची सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असल्याचे भाजपने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.


शिरीष कटेकर यांना व्हायरल व्हिडिओत शिवसेनेचे काही कार्यकर्ते घेरतात आणि त्याच्या अंगावर डोक्यावर काळी शाई ओतताना दिसत आहेत. तसेच त्याची भर बाजारातून धिंड काढताना त्याच्या गळ्यात माळ सदृश्य वस्तू घालताना आणि अंगावर साडी टाकतानाही दिसत आहेत. आक्रमक झालेले हे कार्यकर्ते कटेकर यांना मारहाण आणि शिवीगाळही करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.


दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेवर भाजपच्या सरचिटणीस आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अननननध्यक्षा विजया रहाटकर यांनी निशाणा साधला आहे. किती ही सत्तेची मस्ती अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.