तामिळनाडूत आहे १५ हजार किलोपेक्षा जास्त सोन्याने मढवलेले विश्वप्रसिद्ध लक्ष्मी मंदिर

temple
तामिळनाडूतील वेल्लूरमध्ये श्रीपुरम धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिर असून वेल्लूर शहरातील दक्षिण भागात हे मंदिर आहे. जवळपास १५ हजार किलोग्रॅम विशुद्ध सोन्याचा वापर या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये करण्यात आला आहे तर ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी आला आहे.
temple1
सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये करण्यात आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी असते. १०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चोहीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना वृत्ताकार आहे. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे.

(व्हिडीओ सौजन्य – NDX News)
देशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. काटपाडी स्टेशन वेल्लूर शहरातीलच एक भाग आहे. सोन्यापासून निर्मित हे मंदिर बांधण्यासाठी ७ वर्षे लागले. २४ ऑगस्ट २००७ रोजी हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरात जवळपास २७ फूट उंच दीपमाळ आहे. मंदिर सकाळी ४ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत अभिषेकासाठी आणि सकाळी ८ पासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. येथे वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. कधीकधी एक दिवसामध्ये एक लाख भाविक दर्शनासाठी आलेले असतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर या दीपमाळेचे दर्शन घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment